प्रतिनिधी सागर लोंढे ता. इंदापूर रुई : कर्मवीर शिक्षण संस्था रुई संचलित श्री बाबीर विद्यालयातील गुणवत्ता यादीमध्ये एकूण पाच विद्यार्थी आले आहेत यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे 1. श्रावणी दादा पुणेकर-210 2. आदित्य हनुमंत बोराटे-208 3. स्नेहल सोमनाथ थोरात-202 4. श्रेयश … Read more
ताज्या घडामोडी
अखेर आमदार सौ.सुलभा गायकवाड यांनी विधानसभेत बुद्ध भूमीच्या जमिनीचा मुद्दा केला उपस्थित
कल्याण प्रतिनिधी | कल्याण कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील वादग्रस्त बुद्ध भूमीच्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पोहोचला असून कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांनी अखेर हा विषय औचित्याचा मुद्दा म्हणून सभागृहात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आमदार सुलभाताई गायकवाड यांनी बुद्ध भूमीच्या जमिनीसंदर्भातील वाद स्थानिक नागरिकांच्या भावना तसेच या प्रकरणात … Read more
वंचित बहुजन आघाडीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात लिंबे वडगांव भुसंपादन घोटाळा प्रकरणी जालना जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन
जालना: मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव येथील ग्राम पंचायत आमदार बबनराव लोणीकर यांच्या ताब्यात असल्यामुळे पाटोदा साठवण तलाव बाधीत लिंबे वडगांव येथील दलीत वस्तीतील मुळ रहिवाशांना आमदार बबनराव लोणीकर यांना मतदान न केल्याने राजकीय द्वेषातून जाणिवपूर्वक वगळण्यात आले आहे व सरपंच ग्रामसेवक व उपविभागीय अधिकारी परतुर पद्माकर गायकवाड कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने भुसंपादन अनुदान घोटाळा करण्यात … Read more
१ जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिन “मानवतेच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या प्रत्येक डॉक्टराला कृतज्ञतेचा सलाम!
ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे दरवर्षी १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ डॉक्टरांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून, समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण करून देणारा दिवस आहे. एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलविण्यासाठी, त्याला नवजीवन देण्यासाठी आणि संकटाच्या क्षणी आधार देण्यासाठी डॉक्टर अहोरात्र कार्यरत असतात. रुग्णालयाच्या दारात … Read more
बुद्धभूमी बचाव जन-आक्रोश महामोर्चा भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली महामोर्चा संपन्न
प्रतिनिधी : प्रदीप जाधव कल्याण : बुद्धभूमी बचाव जन-आक्रोश महामोर्चा भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात आयोजित करण्यात आला. बुद्धभूमीच्या संरक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला. महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने भिक्खू, उपासक-उपासिका, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला सहभागी झाले. उपस्थितांनी शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्या मांडत बुद्धभूमीचे … Read more
सेवलीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडी कडून उत्साहात साजरी
जालना : सामाजिक न्याय, समता आणि बहुजन कल्याणाचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जालना तालुक्यातील सेवली येथे वंचित बहुजन आघाडी कडून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. … Read more
घोडजच्या युवकाच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरीय दाद; रूपेश कांबळेंना ‘राजर्षी शाहू समाज भूषण’ सन्मान..
कंधार :ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तनाची मशाल हाती घेऊन संविधानिक मूल्यांचा प्रचार, वंचितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज आणि युवकांमध्ये सामाजिक भान जागविण्याचे कार्य करणारे घोडज (ता. कंधार) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रूपेश कांबळे यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार–२०२६’ या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन नांदेड येथे झालेल्या सोहळ्यात अण्णा … Read more
आवाज वंचित बहुजनांचा न्यूज चॅनेलला भन्ते गौतम रत्न महाथेरो यांचे शुभाशीर्वाद
कल्याण | प्रतिनिधी : प्रदीप जाधव वंचित, बहुजन आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कार्यरत असलेल्या “आवाज वंचित बहुजनांचा” या न्यूज चॅनेलला पूज्य भन्ते गौतम रत्न महाथेरो यांनी शुभेच्छा व मंगलमय आशीर्वाद दिले. … Read more
प्रतिनिधी : प्रदीप जाधव .जालना:मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या १३१ कायम रहिवासी कुटुंबांवर पाटोदा साठवण तलाव प्रकल्पामुळे विस्थापनाचे संकट ओढवले असून, या कुटुंबांना न्याय मिळावा व गावठाणासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कुटुंबांकडे आधार … Read more
पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा
लोहा (नांदेड) : पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि कंधार-लोहा येथील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने लोहा शहरात “जनआक्रोश मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंचशील ध्वजाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी ध्वजाची तात्काळ पुनर्स्थापना करण्याची मागणी … Read more