पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी लोह्यात भव्य जनआक्रोश मोर्चा; आंदोलकांचा प्रशासनाला इशारा


लोहा (नांदेड) : पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि कंधार-लोहा येथील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने लोहा शहरात “जनआक्रोश मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अनुयायी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

पंचशील ध्वजाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी ध्वजाची तात्काळ पुनर्स्थापना करण्याची मागणी केली. मोर्चादरम्यान विविध घोषणाबाजी करण्यात आली तसेच प्रशासनाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

 

या जण आक्रोश मोर्चात आंबेडकरी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 


Leave a Comment

error: Content is protected !!