तिरंग्याच्या मध्यभागी अशोकचक्र; राष्ट्राला दिले समानता आणि प्रगतीचे प्रतीक!

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे २२ जुलै भारतीय राष्ट्रध्वजाच्या इतिहासातील २२ जुलै १९४७ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी संविधान सभेने भारतीय तिरंग्याला अधिकृत मान्यता दिली. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले अशोकचक्र हे केवळ एक चिन्ह नसून ते न्याय, समानता, प्रगती आणि अखंड गतिमानतेचे प्रतीक मानले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रध्वजावर चरख्याचा समावेश होता. मात्र स्वतंत्र … Read more

चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील भारतीय भूभागावरील चिनी अतिक्रमणाबाबत केंद्र सरकारला सडेतोड प्रश्न विचारले आहेत.  अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील ‘नाहा वेल्फेअर सोसायटी’ या स्थानिक संस्थेने २६ जून २०२६ रोजी सुबनसिरी जिल्ह्याच्या उपआयुक्तांना पत्र लिहून म्हटले आहे की, २०२० पर्यंत भारतीय नागरिकांच्या वर्दळीचे असलेले भाग आता … Read more

बाबीर विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा.

इंदापुर प्रतिनिधी- सागर लोंढे   रुई तालुका इंदापूर येथील श्री. बाबीर विद्यालयात येथे आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. बाबीर विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगन्नाथ पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षक तसेच शिक्षिका व कर्मचारी यांना योगा बद्दल माहिती दिली. यावेळी विद्यालयातील शारीरिक शिक्षक आप्पासो डोंबाळे यांनी योगासनाचे … Read more

रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो” — ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर अत्यंत गंभीर आर्थिक मुद्द्यावर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि देशातील वाढत्या आर्थिक विषमतेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो.” … Read more

*१ एप्रिल विशेष “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक अर्थचिंतनाची क्रांती*

ठाणे प्रतिनिधी :- माया खिल्लारे  भारताच्या आर्थिक इतिहासात १ एप्रिल हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भारताचे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या *“The Problem of the Rupee”* या ग्रंथाची विशेष आठवण केली जाते.  ग्रंथाची पार्श्वभूमी “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” हा ग्रंथ 1923 साली प्रकाशित झाला. त्या काळात … Read more

महाडचा चवदार तळे सत्याग्रह : समानतेसाठीचा ऐतिहासिक लढा*

ठाणे प्रतिनिधी – माया खिल्लारे महाड (रायगड) | 20 मार्च 20 मार्च 1927 हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह’ पार पडला. हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी आणि समानतेसाठी उभारलेला निर्णायक लढा होता. महाड येथील चवदार … Read more

पेट्रोल/डिझेल तुटवडा व दरवाढीबाबत पसरत असलेल्या अफवांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड, ४ मार्च:-सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या अफवेमुळे नांदेड जिल्हा तसेच शहरामधील मधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासन स्पष्टपणे कळविते की पेट्रोल किंवा डिझेलचा … Read more

केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना पत्र 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ आंदोलन करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून याविरोधात देश पातळीवर आंदोलन … Read more

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ), मुंबई समोर भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून केली आहे.   काल शुक्रवारी (दि. २०) मुंबईत … Read more

शिवजयंती निमित्त महात्मा फुले यांची आठवण – शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य

ठाणे प्रतिनिधी : माया खिल्लारे आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचे कार्य समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या योगदानाची विशेष आठवण केली जात आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना रयतेचे खरे राजे म्हणून गौरवले. त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य केवळ एका … Read more

error: Content is protected !!