बाबीर विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा.


इंदापुर प्रतिनिधी- सागर लोंढे 

 रुई तालुका इंदापूर येथील श्री. बाबीर विद्यालयात येथे आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी श्री. बाबीर विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगन्नाथ पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षक तसेच शिक्षिका व कर्मचारी यांना योगा बद्दल माहिती दिली.

यावेळी विद्यालयातील शारीरिक शिक्षक आप्पासो डोंबाळे यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक केले, प्रत्येक योगाचे महत्त्व व ते केल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात ते सांगितले. सर्वच विद्यार्थ्यांनी योगासने करून दाखवली या योग कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका, गुरुकुल विभागातील सर्व शिक्षक -शिक्षिका तसेच कर्मचारी वृंद या सर्वांच्या उपस्थितीत योग दिन साजरा केला.


Leave a Comment

error: Content is protected !!