भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन दि. 16 फेब्रुवारी रोजी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन विविध ठिकाणी आदरपूर्वक पाळण्यात आला. भारतीय सिनेमाचा पाया रचणाऱ्या या महान द्रष्ट्या कलावंताच्या कार्याची यावेळी आठवण करून देण्यात आली. १९१३ साली प्रदर्शित झालेल्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय मूकपटाद्वारे त्यांनी देशात चित्रपटनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. अत्यंत … Read more

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा ठाम पाठिंबा

दिल्ली येथे भंते संघरत्न व भंते विनाचार्य यांची बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट दिल्ली/महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आज नवी दिल्ली येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भेट घेतली. या वेळी भंते संघरत्न व भंते विनाचार्य (महाबोधी मुक्ती आंदोलन) उपस्थित होते. या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या … Read more

३३ तास, हजारो प्रवासी आणि शून्य सुविधा; हेच का तुमचे विकसित प्रशासन? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यामुळे झालेल्या ३३ तासांच्या भीषण वाहतूक कोंडीवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ एका टँकर गळतीमुळे संपूर्ण एक्सप्रेसवे ३३ तास ठप्प होणे, हे आपल्या ‘विकसित’ प्रशासनाचे लक्षण आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला … Read more

अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; अंजलीताई आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन

  लातूर : जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर पालकांनी तीव्र संशय व्यक्त केला असून, आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. नेमकी घटना काय?   काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात अनुष्काचा मृतदेह संशयास्पद स्थितीत … Read more

“बाबासाहेबांच्या लेखणीतून जन्मलेला ‘मूकनायक’ : १०६ वर्षांचा संघर्षशील प्रवास”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना, दुःख आणि विद्रोह व्यक्त करण्यासाठी १९२० साली मराठी भाषेतील ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित झाला. आज त्या ऐतिहासिक क्षणाला १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. मूकनायकच्या पहिल्या अंकातील ‘मनोगत’ हा अग्रलेख स्वतः बाबासाहेबांनी लिहिला होता आणि पुढील … Read more

वर्ताळा येथे प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा

 ता.कंधार प्रतिनिधी : बळीराम कांबळे   (वर्ताळा)सोमवार दिनांक 26/01/2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री आचमारे सर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपसरपंच अनिल वाघमारे यांनी शालेय साहित्य वाटप केलं शालेय शिक्षण समीती सदस्य संदिप.गायकवाड यानी विद्यार्थ्यांना खाऊ वाट केला . शेषराव डावकरे गुरुजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. नंतर माननीय … Read more

गिरीश महाजन यांनी भाषणात बाबासाहेबांचे नाव वगळले; महिला कर्मचाऱ्यांचा भाषणादरम्यान तीव्र आक्षेप!

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला.    महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट … Read more

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

  *संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया *“संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते,”* या प्रेरणादायी विचारातून *यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरड शहापूर* यांच्या वतीने शिरड शहापूर व परिसरातील विविध शाळांमध्ये भारतीय संविधान या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज उत्साहात पार पडला. या स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक … Read more

चलो बुद्ध की ओर…” – मुखेड येथील दाडेराव कुटुंबाने घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

मुखेड / नांदेड : पुर्वाश्रमीच्या धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरांना मात देत, मुखेड (जि. नांदेड) येथील मातंग समाजातील दाडेराव कुटुंबाने बौद्ध धम्माची दीक्षा घेत समाजाला समतेचा संदेश दिला आहे. दाडेराव पांडुरंग (शिक्षक), त्यांची पत्नी गोदावरी दाडेराव आणि मुलगा दिपक दाडेराव (PNB Marketing Officer) यांनी अधिकृत धर्मांतर करून बुद्ध, धम्म आणि संघाचा स्वीकार केला. तथागत भगवान गौतम बुद्ध … Read more

३२ वा मराठवाडा नामविस्तार वर्धापनदिन मुदखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा

मुदखेड / प्रतिनिधी : प्रकाश गवारे मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हा आंबेडकरी चळवळीतील धगधगता आणि क्रांतीकारी इतिहासाचा सुवर्णअध्याय आहे. अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्वाच्या या ऐतिहासिक संघर्षात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. हा लढा जरी लाक्षणिक अर्थाने भूतकाळात सामावलेला असला, तरी त्याची प्रेरणा आजही वर्तमानात जिवंत असून भावी पिढ्यांना सदैव उर्जा देणारा अखंड उर्जास्त्रोत ठरतो आहे. … Read more

error: Content is protected !!