
*संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया
*“संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते,”* या प्रेरणादायी विचारातून *यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरड शहापूर* यांच्या वतीने शिरड शहापूर व परिसरातील विविध शाळांमध्ये भारतीय संविधान या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज उत्साहात पार पडला.
या स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक उर्दू शाळा तसेच श्रीशांती विद्यामंदिर, शिरड शहापूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील मनीषा शेषराव राठोड हिने प्रथम, पूजा साहेबराव पवार हिने द्वितीय तर सुमित्रा मारुती बनसोडे हिने तृतीय पारितोषिक पटकावले. ही प्रश्नमंजुषा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूलतत्त्वांवर आधारित भारतीय संविधान विषयावर घेण्यात आली होती.
तसेच इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ओमकार बेले या विद्यार्थ्यास यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विशेष ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळा उर्दू
प्रथम पारितोषिक आफ्रीम बाबा खान
द्वितीय पारितोषिक
इरम सय्यद असलम
तृतीय पारितोषिक
शिफा शेख शहादत
व तसेच श्री शांती विद्या मंदिर येथील प्रथम पारितोषिक श्रेया अनिल कांबळे
द्वितीय पारितोषिक समीक्षा मुंजाजी सरकटे व तृतीय पारितोषिक अंजली पंजाब मस्के व मागील वर्षी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी शाळेत प्रथम सन् 2024-25
कु.श्रुती राम रावले – 93.20%
या विद्यार्थिनी यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे ट्रॉफी चे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. ढगे सर,पाटील सर, चंद्रवंशी सर, लांबदाडे मॅडम, व्यवहारे सर जिल्हा परिषद शाळा उर्दूचे मुख्याध्यापक जाविद सर शालेय समिती अध्यक्ष स.असलम, व गावकरी मंडळी, सुरेश शांती विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री.काळे सर गावकरी मंडळी व शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, प्रा. डॉ. सुरेश शेळके, अॅड. मुस्ताक अहमद, संतोबा अंभोरे, आनंद ढेंबरे, जमशेद खान पठाण,हनीफ पठाण,श्यामसुंदर ठोंबरे, यशवंत कांबळे,नारायण सूर्यतळ,यांच्यासह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते….
वंचित बहुजन आघाडी हिंगोली