प्रतिनिधी : प्रदीप जाधव
.जालना:मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या १३१ कायम रहिवासी कुटुंबांवर पाटोदा साठवण तलाव प्रकल्पामुळे विस्थापनाचे संकट ओढवले असून, या कुटुंबांना न्याय मिळावा व गावठाणासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कुटुंबांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी शासकीय कागदपत्रे असून ते अनेक वर्षांपासून गावातील दलित वस्तीत वास्तव्यास आहेत. पाटोदा साठवण तलावामुळे त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरत असल्याने शासनाने घरे व इतर जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या कुटुंबांना अद्याप पर्यायी जागा किंवा पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय देण्यात आलेला नाही.
ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते ५ वाजेदरम्यान तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या सह रमेश भुतकर, सतीश डोंबे,भागवत होळकर, सिद्धार्थ जाधव, विजय जाधव, दीपक जाधव, श्रीरंग खरात विलास जाधव ,सुदाम जाधव ज्ञानेश्वरहोळकर,आनंदजाधव ,बाळूजाधव ,बालासाहेबविभुते,रामप्रसाद विभुते,पार्वतीबाई होळकर,त्रिवेणीहोळकर,सुमनबाईहोळकर,सुनिताजाधव ,निताजाधव ,शोभाबाईजाधव,कालींदापितळे,आशामतीआवचार,सिंधुबाईजाधव,ज्योतीविभुते,बहिणाबाईभुतकर,कुशावरता होळकर यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती..


Leave a Comment

error: Content is protected !!