कल्याण | प्रतिनिधी : प्रदीप जाधव
वंचित, बहुजन आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कार्यरत असलेल्या “आवाज वंचित बहुजनांचा” या न्यूज चॅनेलला पूज्य भन्ते गौतम रत्न महाथेरो यांनी शुभेच्छा व मंगलमय आशीर्वाद दिले. यावेळी भन्ते गौतम रत्न महाथेरो यांनी सांगितले की, समाजातील सत्य, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. “आवाज वंचित बहुजनांचा” हे चॅनेल वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडून सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी चॅनेलच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत पत्रकारितेत निःपक्षपातीपणा, सामाजिक बांधिलकी आणि लोकहित यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
बुद्ध, धम्म आणि मानवतावादी मूल्यांच्या आधारे समाजजागृतीचे कार्य अधिक व्यापकपणे व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या शुभेच्छांमुळे “आवाज वंचित बहुजनांचा” न्यूज चॅनेलच्या कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना चॅनेलच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
Nice work and coverage with reference to Buddha Bhumi Bachav Aandolan start from 15 June 2026 and wide announcement of Buddha Bhumi Bachav Jan Akrosh Mahamorch organised on 29June 2026
Nice work and coverage with reference to Buddha Bhumi Bachav Aandolan start from 15 June 2026 and wide announcement of Jan Akrosh Mahamorch organised on 29June 2026