सेवलीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडी कडून उत्साहात साजरी


जालना : सामाजिक न्याय, समता आणि बहुजन कल्याणाचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जालना तालुक्यातील सेवली येथे वंचित बहुजन आघाडी कडून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.                                                                  यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर उपस्थितांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा व समतावादी विचारांचा जागर करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके,अरुण काकडे शत्रुघ्न कोळी, निवृत्ती डोके, गणेश उबाळे,दिलीप मगर गौतम मगर,अर्जुन घुगे सुनील खाडे, विलास काळे, बाबासाहेब खाडे, विजय काळे,लखन डोके, दिलीप खाडे, सुरेश पवार, रमेश पवार दिलीप बिबे, लक्ष्मण पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.     कार्यक्रमात उपस्थितांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा आदर्श समाजाने कायम जपला पाहिजे, असा संदेश देत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Leave a Comment

error: Content is protected !!