वंचित बहुजन आघाडीने आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात लिंबे वडगांव भुसंपादन घोटाळा प्रकरणी जालना जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने आंदोलन


जालना: मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव येथील ग्राम पंचायत आमदार बबनराव लोणीकर यांच्या ताब्यात असल्यामुळे पाटोदा साठवण तलाव बाधीत लिंबे वडगांव येथील दलीत वस्तीतील मुळ रहिवाशांना आमदार बबनराव लोणीकर यांना मतदान न केल्याने राजकीय द्वेषातून जाणिवपूर्वक वगळण्यात आले आहे व सरपंच ग्रामसेवक व उपविभागीय अधिकारी परतुर पद्माकर गायकवाड कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने भुसंपादन अनुदान घोटाळा करण्यात आला आहे.

म्हणून दोषींवर कार्यवाही करुन गुन्हे दाखल करण्याच्या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या सह जिल्हा संघटक राजेंद्र खरात,बोरखेडी सरपंच मनोहर म्हस्के, जेष्ठ नेते एम व्ही चौधरी सतिश डोंबे, दिपक जाधव,बाबासाहेब अवचार,प्रमेश्वर महाजन, अरुण खनपटे आनंद जाधव गौतम जाधव सचिन भुतेकर आसाराम होळकर श्रीरंग खरात विठ्ठल होळकर दत्ता देवकाते लक्ष्मण महाजन दगडू खनपटे रामप्रसाद विभुते रमेश भुतेकर विकास खनपटे परमेश्वर महाजन करण जाधव विकास होळकर विठ्ठल बोरकर प्रभाकर खनपटे व शेकडो महिलांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!