जालना जिल्हा थार येथे आसराबाई जाधव यांचा जलदान विधी कार्यक्रम संपन्न

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव थार येथील दिवंगत आसराबाई जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित जलदान विधीचा कार्यक्रम थार गावात श्रद्धा व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास नातेवाईक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण पंचशीला घेण्यात आले. त्यानंतर जलदान विधी पार पाडून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी आसराबाई जाधव … Read more

वंचितचा बालेकिल्ला राखण्यासाठी सुजात आंबेडकर मैदानात; सहा प्रभागांत झंझावाती दौरा

अकोला : आगामी अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद झोकून दिली असून, युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काल एकाच दिवशी सहा विविध प्रभागांत झंझावाती प्रचार दौरा केला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विकासाच्या मुद्द्यावर भर आणि … Read more

जिल्हा जालना मौजे अहंकार देऊळगाव गावातील दुखःद आणि सर्वांना हळहळ करायला लावणारी घटना

आईसोबत तळ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिण भावांचा पाण्यात बुडून मृत्यू. मृत झालेले दोघे बहीण भावंडे प्रमोद ग्यानोबा खरात यांचे आपत्य होते. सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आपल्या मुला बाळांना कुठेही एकटे सोडू नका. काळजी घ्या…! 🙏🙏🙏 जड अंतःकरणाने भावपुर्ण श्रद्धांजली बाळांनो !

अकोला महापालिका निवडणूक | शास्त्री नगरात सुजात आंबेडकरांची जाहीर सभा

शास्त्री नगर, अकोला | प्रतिनिधी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची शास्त्री नगर येथे जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी अकोला शहराच्या मूलभूत प्रश्नांवर सडेतोड भूमिका मांडली. अकोला शहर स्वच्छ व सुंदर करणे, नागरिकांसाठी उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून … Read more

प्रा.कासीम जाफर शेख यांचा शाहरुख पठाण मित्र मंडळाच्या वतीने सत्कार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर. बारूळचे भूमिपुत्र प्रा.कासिम जाफरसाब शेख यांनी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात दिलेली प्रदीर्घ सेवेनंतर सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रथमच बारुळ येथे आल्यानंतर बबलू शेख बारुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत छोटेखाणी कार्यक्रमात शाहरुख पठाण मित्र मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करून पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सेवेनिवृत्तीनंतरचे जीवन आरोग्यदायी,आनंदी व समाधानकारक जावे अशी ह.ख्वाजा … Read more

संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला सत्तेबाहेर फेका – सुजात आंबेडकरांचा लातूरमध्ये एल्गार

लातूर : “गेल्या पाच वर्षांपासून निवडणुका न घेता भाजपने आपल्या मर्जीतले प्रशासक बसवून महापालिकेचा कारभार चालवला आहे. जनतेचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेणे आणि निवडणूक प्रक्रिया डावळणे हा संविधानाचा उघड अपमान आहे. संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला आणि भ्रष्ट राष्ट्रवादीला सत्तेबाहेर फेकून देण्याची वेळ आली आहे,” अशा कडक शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी … Read more

फुले–शाहू–आंबेडकरवादी मतदारांनी १०० टक्के मतदान केल्यास पूर्ण पॅनल विजयी होईल – ॲड. प्रकाश आंबेडकर

नांदेड | प्रतिनिधी नांदेड महानगरपालिका निवडणुकीत फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांनी जर शंभर टक्के मतदान केले, तर वंचित बहुजन आघाडी–काँग्रेस युतीचे पूर्ण पॅनल निवडून येईल, असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ते नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण … Read more

वंचित बहुजन आघाडीतर्फे जालना शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त अभिवादन

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त जालना शहरातील अंबड चौफुली जवळ मंठा बायपास रोड वर असलेल्या वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शैक्षणिक आणि … Read more

माता सावित्रीबाई फुले यांची जयंती जि प प्रा शा पांडे पोखरी या शाळेत साजरी करण्यात आली.

ता. परतूर प्रतिनिधी : दिपक नाटभजन काल दिनांक 3 जानेवारी २०२६ रोजी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती जि प प्रा शा पांडे पोखरी या शाळेत साजरी करण्यात आली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाषणे केली . गीते गायली. सावित्रीबाई फुले मुळे महिलांच्या जीवनात झालेल्या बदल हे अनमोल आहेत. माता सावित्रीबाई नसती तर महिलांचे भविष्य हे अंधकारमय असतं आणि … Read more

भीमाकोरेगाव येथे पुस्तक स्टॉलना उस्फूर्त प्रतिसाद; अमोल लहाने यांनी घेतली १० हजार रुपयांची पुस्तके

जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव भीमाकोरेगाव : १ जानेवारी रोजी शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमाकोरेगाव विजयस्तंभ परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पुस्तक स्टॉल उभारण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, बुद्ध धम्म, सामाजिक न्याय, संविधान आणि परिवर्तनवादी विचारधारेवरील पुस्तकांसाठी आंबेडकरवादी अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या पुस्तक स्टॉलना यावर्षीही प्रचंड प्रतिसाद लाभला असून, … Read more

error: Content is protected !!