भीमाकोरेगाव येथे पुस्तक स्टॉलना उस्फूर्त प्रतिसाद; अमोल लहाने यांनी घेतली १० हजार रुपयांची पुस्तके


जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

भीमाकोरेगाव : १ जानेवारी रोजी शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमाकोरेगाव विजयस्तंभ परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पुस्तक स्टॉल उभारण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, बुद्ध धम्म, सामाजिक न्याय, संविधान आणि परिवर्तनवादी विचारधारेवरील पुस्तकांसाठी आंबेडकरवादी अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या पुस्तक स्टॉलना यावर्षीही प्रचंड प्रतिसाद लाभला असून, वाचकांनी मोठ्या उत्साहात पुस्तके खरेदी केली. विशेष बाब म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गोदरी गावचे अमोल लहाने यांनी तब्बल १० हजार रुपयांची विविध विचारधारात्मक पुस्तके खरेदी केली. समाजप्रबोधन व वैचारिक समृद्धीसाठी पुस्तक वाचन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भीमाकोरेगाव येथे केवळ विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठीच नव्हे, तर विचारांची शिदोरी घेऊन जाण्यासाठीही हजारो आंबेडकरवादी अनुयायी येत असल्याचे या पुस्तक स्टॉलवरील गर्दीवरून स्पष्ट होते. वाचन संस्कृती जोपासण्याचा हा सकारात्मक संदेश भीमाकोरेगावच्या शौर्य दिन सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!