MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुजात आंबेडकर यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद


Pune: आज पुण्यात MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोष उफाळून आला असून, विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. गरवारे महाविद्यालयाजवळील एस. एम. जोशी पूल, शास्त्री रस्ता परिसरातील अहिल्यादेवी शिक्षण मंडळ आणि टिळक चौक अशा तीन प्रमुख ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या.

या आंदोलनात मोठ्या संख्येने MPSC विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.


Leave a Comment

error: Content is protected !!