
ता. परतूर प्रतिनिधी : दिपक नाटभजन
काल दिनांक 3 जानेवारी २०२६ रोजी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती जि प प्रा शा पांडे पोखरी या शाळेत साजरी करण्यात आली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाषणे केली . गीते गायली. सावित्रीबाई फुले मुळे महिलांच्या जीवनात झालेल्या बदल हे अनमोल आहेत. माता सावित्रीबाई नसती तर महिलांचे भविष्य हे अंधकारमय असतं आणि चूल आणि मूल शिवाय त्यांना काही दुसरे सुचलं नसतं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते .

म्हणजे स्त्री ही त्या यशस्वी पुरुषाची प्रेरणा असते .जशी की शिवाजी महाराजांची प्रेरणा या जिजामाता होत्या . महात्मा फुले यांच्या प्रेरणा सावित्रीबाई होत्या. डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रेरणा माता रमाई होत्या. शाळेतील मूडीराज मॅडम यांनी मुलांना सावित्रीबाई फुले विषयी माहिती सांगितली. तसेच भागवत मॅडम यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. काटे सरांनी मुलींचे शिक्षण कसे महत्वाचे हे सांगितले. मुख्याध्यापक सावंत सरांनी सावित्रीबाई यांच्या जीवनावर गीत गाऊन प्रकाश टाकला. गायकवाड सर आणि बादाडे सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य सुद्धा उपस्थित होते.अशाप्रकारे कार्यक्रमाचे सांगत झाली.