जालना जिल्हा थार येथे आसराबाई जाधव यांचा जलदान विधी कार्यक्रम संपन्न


जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

थार येथील दिवंगत आसराबाई जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित जलदान विधीचा कार्यक्रम थार गावात श्रद्धा व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास नातेवाईक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण पंचशीला घेण्यात आले. त्यानंतर जलदान विधी पार पाडून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी आसराबाई जाधव यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक योगदानाचा गौरव केला.

कार्यक्रम शांततापूर्ण व सुव्यवस्थितरीत्या पार पडला. शेवटी उपस्थित सर्वांचे आयोजक कुटुंबीयांच्या वतीने आभार मानण्यात आले.


Leave a Comment

error: Content is protected !!