अकोला महापालिका निवडणूक | शास्त्री नगरात सुजात आंबेडकरांची जाहीर सभा


शास्त्री नगर, अकोला | प्रतिनिधी

अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची शास्त्री नगर येथे जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी अकोला शहराच्या मूलभूत प्रश्नांवर सडेतोड भूमिका मांडली. अकोला शहर स्वच्छ व सुंदर करणे, नागरिकांसाठी उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देणे, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा तसेच सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.

सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनीही मार्गदर्शन करत वंचित बहुजन आघाडीचा विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडला.

 

या जाहीर सभेमुळे शास्त्री नगर परिसरात निवडणूक प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


Leave a Comment

error: Content is protected !!