डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारत पुन्हा एकदा उभा करून दाखवायचा आहे – सुजात आंबेडकर


येवला : येवला मुक्तीभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक आणि प्रमुख उपस्थित म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर उपस्थित होते.

येवला मुक्तीभूमीत आपल्या भाषणात सुजात आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या येवला मुक्तीभूमीमध्ये धर्मांतराची भूमिका घेतली, या व्यवस्थेविरोधात एक बंड पुकारले, तेव्हा आपल्यासारख्या लाखो लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला आणि आपल्या सर्वांना माणसांत आणले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा जरी धर्मांतराची असली, बंड जरी धम्माचे असले, तरी त्यामागील कार्य हे राजकीय आणि सामाजिकच होते. ज्या पद्धतीने आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्माचे बंड स्वीकारले आणि बौद्ध धम्मात आलो, तसेच आपल्याला बाबासाहेबांचे राजकीय आणि सामाजिक बंडसुद्धा स्वीकारायचे आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला प्रबुद्ध भारत पुन्हा एकदा उभा करून दाखवायचा आहे.

 

भीमा कोरेगाव, डॉ. पायल तडवी आणि साहिल वाकोडे यांच्यासारख्या प्रकरणांत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकरवादी पक्षाची गरज आहे. तसेच, त्यांनी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे 35 हजार कोटींचे बजेट आहे. कुंभमेळ्याचे हे बजेट शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावे. कुंभमेळ्याचे बजेट वापरून महाराष्ट्राचा शेतकरी वाचवा, अशी आमची सरकारकडे मागणी आहे, असे यावेळी सांगितले.

 

यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!