माता रमाई आंबेडकर चौकात गिरीश महाजनांचा निषेध; वंचित बहुजन युवा आघाडीची आंदोलनातून आक्रमक भूमिका

नांदेड : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध नांदेडमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज माता रमाई आंबेडकर चौक, सिडको येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. नेमकी घटना काय?   नाशिक येथील पोलीस परेड … Read more

वर्ताळा येथे प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा

 ता.कंधार प्रतिनिधी : बळीराम कांबळे   (वर्ताळा)सोमवार दिनांक 26/01/2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री आचमारे सर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपसरपंच अनिल वाघमारे यांनी शालेय साहित्य वाटप केलं शालेय शिक्षण समीती सदस्य संदिप.गायकवाड यानी विद्यार्थ्यांना खाऊ वाट केला . शेषराव डावकरे गुरुजी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. नंतर माननीय … Read more

शेवगा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त बालविवाह विरोधी शपथ कार्यक्रम संपन्न

शेवगा (परतूर प्रतिनिधी – दीपक नाटभजन) : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगा येथे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी बालविवाह विरोधी शपथ घेत समाजात जनजागृतीचा संदेश दिला.   कार्यक्रमात बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्यावर गंभीर परिणाम होतो, याची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “बालविवाह करणार नाही आणि … Read more

यशवंत विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव उल्हासनगर येथील यशवंत विद्यालयामध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यशवंत विद्यालयाच्या माध्यमिक विभागातील शिक्षकेतर कर्मचारी श्री. मोहन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला. या कार्यक्रमास श्रीराम शिक्षण … Read more

गिरीश महाजन यांनी भाषणात बाबासाहेबांचे नाव वगळले; महिला कर्मचाऱ्यांचा भाषणादरम्यान तीव्र आक्षेप!

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला.    महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट … Read more

भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

  *संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया *“संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते,”* या प्रेरणादायी विचारातून *यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरड शहापूर* यांच्या वतीने शिरड शहापूर व परिसरातील विविध शाळांमध्ये भारतीय संविधान या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज उत्साहात पार पडला. या स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक … Read more

चलो बुद्ध की ओर…” – मुखेड येथील दाडेराव कुटुंबाने घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

मुखेड / नांदेड : पुर्वाश्रमीच्या धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरांना मात देत, मुखेड (जि. नांदेड) येथील मातंग समाजातील दाडेराव कुटुंबाने बौद्ध धम्माची दीक्षा घेत समाजाला समतेचा संदेश दिला आहे. दाडेराव पांडुरंग (शिक्षक), त्यांची पत्नी गोदावरी दाडेराव आणि मुलगा दिपक दाडेराव (PNB Marketing Officer) यांनी अधिकृत धर्मांतर करून बुद्ध, धम्म आणि संघाचा स्वीकार केला. तथागत भगवान गौतम बुद्ध … Read more

परभणी : ताडकळसमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रचार दौरा संपन्न

परभणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ताडकळस येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार दौरा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. सभेला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित … Read more

कंधार तालुक्यातील ४ बंजारा भटक्या महिलांना प्रजासत्ताक दिन परेडसाठी दिल्लीला जाण्याचा मान

नांदेड : देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या राष्ट्रीय सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील तांड्यावरील चार भटक्या महिलांना सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. ही बाब संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) आणि SDD प्रोजेक्ट यांच्या संयुक्त … Read more

बौद्ध महासभेची ऐतिहासिक परिषद; बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

📍 बाळापूर (अकोला) | प्रतिनिधी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित महापरित्राण पाठ व महासंघदान परिषद आज बाळापूर येथे अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे पार पडली. या ऐतिहासिक परिषदेच्या निमित्ताने परिसरात बौद्ध अनुयायांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या परिषदेला बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी बौद्ध धम्म, सामाजिक … Read more

error: Content is protected !!