
कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव
उल्हासनगर येथील यशवंत विद्यालयामध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यशवंत विद्यालयाच्या माध्यमिक विभागातील शिक्षकेतर कर्मचारी श्री. मोहन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला.

या कार्यक्रमास श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. डॉ. विलास चौधरी, सचिव श्री. सुधाकर ढाके, माजी अध्यक्ष नाना सावंत, संस्थापक श्री. दिलीप सपकाळ, सभासद श्री. गणेश क्षीरसागर, अंतर्गत हिशोब तपासणी श्री. राजेश भंगाळे, तसेच रोटरी क्लब ऑफ विठ्ठलवाडीचे अध्यक्ष श्री. दयाल जयसिंघानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
