पारधी आदिवासी समाजातील महिलेस झालेल्या मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांची भेट


जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

जालना : तालुक्यातील पुणेगाव येथील पारधी आदिवासी समाजातील महिला सोनाली चव्हाण यांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित महिला तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असता तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पारधी जमातचं गुन्हेगार आहे म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे जातीवाचक बोलुन अपमानास्पद वागणूक दिली याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पारधी आदिवासी समाजाच्या वतीने धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.

पोलिस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांची भेट घेत संबंधित मारहाण प्रकरणातील आरोपी व तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे नसता दोन दिवसात पोलिस उप अधीक्षक कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे यावेळी फाशी पारधी आदिवासी संघटना अध्यक्ष दिपु पवार,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, विलास भिंगारे,सत्यपाल गायकवाड, गौतम काकडे, सोनाली चव्हाण निलाताई काकडे,संजय आदमाने,चंद्रा पवार , राधाबाई भोसले ,आरकेस्ट्रा चव्हाण , पुजा चव्हाण प्रशांत सोनवणे,गोपाल पवार यांच्या सह शेकडो महिलांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Leave a Comment

error: Content is protected !!