
नांदेड /नांदेड येथील उस्मानशाही मिल मध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतो म्हणून कामावरून काढलेले संजय वाघमारे यांना उच्च न्यायालयाने न्याय दिला आहे.
नांदेड येथील उस्मानशाही मिल (एन टी सि मिल) हे नांदेडचं वैभव होत. हजारो लोकांना रोजगार मिळत असे.
या मिल मिलमध्ये कामगारांची मानसिक,शारीरिक व आर्थिक पिळवणूक विरोधात भारिप बहुजन महासंघाचे तत्कालीन प्रवक्ते संजय वाघमारे यांनी २००८ मध्ये आंदोलन केले होते, त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकले होते.
संजय वाघमारे यांनी त्या विरोधान न्यायालयीन लढाई सुरु केली,नांदेड कामगार न्यायालयात संजय वाघमारे यांच्या बाजूने निर्णय देत नुकसान भरपाई सहा टक्के व्याजासह तीन लाख रुपये देण्याचे निर्देश दिले.
या निर्णया विरोधात एन.टी.सी.मिलने जालना येथील औद्योगिक न्यायालयात अपीन केले व तिथे संजय वाघमारे यांच्या विरोधात निर्णय गेला.
संजय वाघमारे यांनी जालना औद्योगिक न्यायालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात अपील केले असता,औरंगाबाद उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती मा.सिद्धेश्वर ठोंबरे यांनी नांदेड कामगार न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
संजय वाघमारे यांनी दोन दशक लढलेला लढ्यास,यश आले असून कामगार चळवळीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.संजय वाघमारे यांच्या कामगार लढायला यश आले असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे..