तालुका कळमनुरी पोलीस पाटील भरती तयारीसाठी मोफत पुस्तकांचे वाटप, त्वरित संपर्क साधा.


कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव

कळमनुरी तालुक्यात सध्या पोलीस पाटील भरती एकूण 89 रिक्त पदाची भरती सुरू आहे.यासाठी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने या भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये लागण्यासाठी मदत व्हावी यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.तरी तालुक्यातील पोलीस पाटील भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विद्याभारती पोलीस पाटील मार्गदर्शक, आपला हिंगोली जिल्हा, चालू घडामोडी व सामान्य ज्ञान अशा पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालय कळमनुरी,यांच्याशी संपर्क साधून मोफत पुस्तके घेऊन जावे व व यशस्वी होण्यासाठी चांगल्या प्रकारे उत्साहात तयारी करावी, असे आव्हान कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी केले आहे.

 


Leave a Comment

error: Content is protected !!