वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न… महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील विजयाचा फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा.


आवाज वंचित बहुजनांचा

कळमनुरी : दि.17/01/2026

आज कळमनुरी शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी,कळमनुरी तालुक्याच्या वतीने आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था 2026 ,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीमध्ये सर्व सर्कल मधील पदाधिकारी यांची निवड, बूथ बांधणी ,उमेदवारांची निवड व इतर संघटनात्मक बांधणी संदर्भात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. या निवडणुकीत पूर्ण ताकदिने लढण्याचा निर्धार समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमाचे नियोजनकर्ते म्हणून कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे तसेच मोहम्मद असलम युवा तालुका अध्यक्ष यांच्यावतीने होते.

सदरील सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते समाधान पाईकराव यांनी केले. 

प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष राजू कांबळे,भूषण पाईकराव (सं.वि.आ.जि.अ.) ,मोहम्मद असलम (युवा ता.अध्यक्ष),प्रश्नात चोपडे,(सं.वि.आ.ता.अ.),जयभीम डोंगरे (युवा ता.सचिव), राष्ट्रपाल कोकरे ( युवा ता.उपाध्यक्ष),यशवंत नरवाडे (ज्येष्ठ कार्यकर्ते),जेष्ठ काशिनाथ साळवे, विजय जोंधळे (ता.स.),अँड.बुधरत्न बलखंडे (ता.स.),ज्येष्ठ भगवान ढेपे,कार्यकर्ते मुकिंदा ढेपे,आनंद पाईकराव (श.महासचिव),जितेश कदम (श.सचिव),मनोज वाढवे (श.उपाध्यक्ष),दिनेश पाईकराव (श.उपाध्यक्ष),बापुराव महाजन,दाती शा.अध्यक्ष विनोद ढेपे,दाती शा.अध्यक्ष करण नरवाडे, बऊर शा.सचिव दादाराव खंदारे,ईश्वर खंदारे,विशाल नरवाडे, राष्ट्रपाल वाढवे, राहुल नरवाडे,अविनाश कोकरे,हर्षद कोकरे,सिद्धांत बलखंडे,आनंदा मोगले , सुनील खंडागळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी,ता.कळमनुरी जि.हिंगोली.


Leave a Comment

error: Content is protected !!