
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालना: जाफ्राराबाद तालुक्यातील गाढेगव्हाण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका समोरील आंबेडकरी समाजाच्या ताब्यातील जागेवर अतिक्रमण करून दोन समाजात गावातील गावगुंड जातीय तेढ निर्माण करीत आहेत.यासंदर्भात टेंभुर्णी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री . कैलास भारती यांनी तक्रार न घेतल्यामुळे जालना येथील पोलिस अधीक्षक कार्यालयची गावकऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकऱ्यांनी धाव घेतली असता स्थायिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांची शिष्टमंडळाने भेट घेतली व अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री .आयुष नोपाणी यांच्याशी दुरध्वनी वरून संवाद साधला असता संबंधित गावगुंड व सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री .कैलास भारती यांच्यावर कार्यवाही करण्या येईल असे त्यांनी कळवले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संदर्भात लेखी स्वरूपात निवेदन सादर केले आहे.गावगुंड व संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना दिला आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, प्रकाश बोर्डे, अन्ना साळवे,संजय आदमाने,विजय सावंत,बबन सावंत,संजय सावंत, कडूबा हिवाळे, संतुकराव सावंत,तेजराव खरात, सिद्धार्थ सावंत ,सुनील हिवाळे ,भगवान घोरपडे ,अरुण सावंत, विष्णु सावंत, विठ्ठल दाभाडे,द्वारकाबाई हिवाळे,आशाबाई सावंत, रमाबाई हिवाळे ,सुनिता सावंत,शिलाबाई सावंत ,सिंधुबाई घोरपडे ,छाया हिवाळे ,सुनिता सावंत,शोभाबाई खरात,सरसाबाई सावंत यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





