अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने



नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अमर साबळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेडच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत घोषणाबाजी केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, उत्तर जिल्हाध्यक्ष राज अटकोरे, उत्तर युवक जिल्हाध्यक्ष (नगरसेवक प्रतिनिधी) आकाशव जोंधळे, उत्तर महानगराध्यक्ष (नगरसेवक) राहुल सोनसळे, नगरसेवक कुलदीप राक्षसमारे, दक्षिण महानगराध्यक्ष गोपालसिंग टाक यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी आंदोलकांनी अमर साबळे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

 

 


Leave a Comment

error: Content is protected !!