नगरपरिषद निवडणुकीतील वंचितने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर बोरगांव येथे फटाके फोडून अतिशबाजी व जल्लोष 


परतूर ता. प्रतिनिधी दिपक नाटभजन

जालना तालुक्यातील बोरगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपरिषद निवडणुकीतील वंचितने मिळवलेल्या यशाचा फटाके फोडून जल्लोष करण्यात आला नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालना जिल्ह्यातील बोरगांव सह विविध गावांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे १०४ नगरसेवक आणि ५ नगराध्यक्ष निवडून आल्याने या यशाचा आनंद बोरगांव येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व कार्यकर्त्यांना पेढे भरवण्यात आले यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा सचिव गणेश खरात, दिलीप मगर, गौतम मगर, गणेश रामभाऊ कायदे,बद्रीनाथ सुधाकर कायंदे,डिगांबर गोरे, गणेश पंढरीनाथ कायंदे, शामराव लोंढे, आनंद लोंढे,भास्कर पाडमुख, बाबासाहेब वामनराव डोके मदन डोके, एकनाथ दसरथ डोके, अनिल एकनाथराव डोके,दिनकर डोके, विष्णु डोके, दिपक भिमराव डोके,शरद सारंगधर डोके, अदित्य डोके,सुमीत डोके ,अविनाश डोके, सम्यक डोके, युवराज तुरेराव ,यमुनाबाई डोके, शिवगंगाबाई पाडमुख, मुक्ताबाई डोके,अतीकाबाई डोके,पाडमुख,वर्षा बाबासाहेब डोके,कौसाबाई डोके, राधाबाई भुतेकर यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते‌


Leave a Comment

error: Content is protected !!