
परतूर प्रतिनिधी : दिपक नाटभजन
जालना शहर महानगरपालिका निवडणूक -२०२६, वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक १३ चे अधिकृत उमेदवार प्रा.सत्यपाल गायकवाड ,माया वानखेडे व पुरस्कृत उमेदवार अंजुम बेगम शेख जुनेद मनियार ,विशाल मगरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या हस्ते शहरातील संजय नगर येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व भव्य रॅलीचे आयोजन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा महासचिव प्रशांत कसबे, जेष्ठ नेते खालेद चाऊस, माजी नगरसेवक काशीनाथ मगरे,,बाबा खान , शेषराव गायकवाड,सागर निसर्गंध,दिपक खाजेकर, संतोष मगर यांच्या सह प्रमुख उपस्थित होते.या प्रचार रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी होते.