
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीयअध्यक्ष “श्रद्धेय” ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेशान्वये श्रीरामपूर तालुक्यासाठी नविन कमेटी गठीत करण्यात आली.
या कामी प्रदेशमहासचिव प्रा. किसन चव्हाणसर, प्रदेशउपाध्यक्षा तथा निरीक्षक दिशाताई शेख, जि.अध्यक्ष संतोष चोळके, जि.महासचिव मधुकर साळवे, आणि जिल्हा कमेटीने हा निर्णय घेतला.
सदर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा येथोचित सत्कार टिळकनगर / रांजणखोल पंचक्रोशीच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने लूंबिनी बुद्ध विहार श्रीरामपूर या ठिकाणी करण्यात आला.

सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची संकल्पना युवा आघाडीचे जिल्हामहासचिव तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हासदस्य सुनिल वाघमारे यांची होती.
(तालुकध्यक्ष) डॉ. गौतम चित्ते, (तालुकापाध्यक्ष) विशाल पठारे, (ता.उपाध्यक्ष) संतोष मोरे, (तालुकासंघटक) योगेश घोडके
या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (जिल्हासचिव) मा. सुनीलजी ब्राह्मणे साहेब हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भाऊ वाघमारे यांनी केले.
या वेळी मधुकर साळवे, सावंतसाहेब, म्हस्केगुरुजी, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा वैशालीताई अहिरे, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, सि. एस. बनकर, ॲडव्होकेट अमोल सोनावणे, संतोष त्रिभुवन, दादासाहेब बनकर,
कामगारनेते नंदू भाऊ गंगावणे, डॉक्टर चंद्रसेन भडांगे, बाळासाहेब खरात, राहुल गायकवाड, साईनाथ कणगरे, चैतन्य गायकवाड, रवी शेलार, सलीमभाई शेख, राकेश सोज्वळ, श्रीकांत त्रिभुवन, घनश्याम खंडागळे, अरुण त्रिभुवन, गोपीनाथ दुशिंग, इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
उपस्थितांचे आभार विलास अहिरे यांनी मानले.