सुशिक्षित,निष्कलंक आंबेडकरवादी तरुण जास्तीत जास्त प्रमाणात नांदेड मनपा मध्ये निवडून देणार आंबेडकरवादी तरुणांचा निर्धार.


नांदेड :येथील सारनाथ बुद्ध विहार सावित्रीबाई फुले नगर इथे नांदेड येथील आंबेडकरवादी तरुणांची बैठक झाली या बैठकीमध्ये आंबेडकरवादी विचारांचे तरुण निवडून देण्याचा निर्धार सर्वांनी एक मतांनी घेतला.

काँग्रेस आणि भाजपा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून या दोन पक्षांपासून आंबेडकरवादी तरुणांनी दूर राहिले पाहिजे.

येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जास्तीत जास्त प्रमाणात सुशिक्षित निष्कलं तरुणांना संधी द्यावी हा सूर सर्व युवकांन मधून निघाला.

सारनाथ बुद्ध विहार सावित्रीबाई फुले नगर येथे झालेल्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी तरुण उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!