खांदा कॉलनी – वंचित बहुजन आघाडीच्या उपक्रमांना नवी ऊर्जा, नामफलकाचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न.


खांदा कॉलनी | दिनांक 28 नोव्हेंबर रोजी 

वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अंतर्गत वंचित बहुजन आघाडी, खांदा कॉलनी विभागात, विभागाध्यक्ष, आयु. महेंद्र रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवनिर्मित नामफलकाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि जयभीममय वातावरणात हा कार्यक्रम अतिशय ऐतिहासिक ठरला.

हा उद्घाटन सोहळा वंचित बहुजन आघाडी, पनवेल महानगर अध्यक्ष, मा. आनंद गायकवाड साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले –

पनवेल महानगर उपाध्यक्षा आयु. कविताताई वाघमारे

पनवेल महानगर संघटक आयु. भागुराम भेकरे

यावेळी उपस्थित मान्यवरांनी खांदा कॉलनी विभागाच्या कार्याची प्रशंसा करत आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास, वंचित बहुजन आघाडी

पनवेल महानगर अध्यक्ष आयु. आनंद गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. छायाताई शिरसाट, आयु. भालचंद्र शिंदे, महासचिव आयु. संतोष मुजमुले,आयु. अविनाश अडागळे, कोशाध्यक्ष आयु. चंद्रकांत नवगिरे , प्रसिद्धी प्रमुख आयु. राहुल चव्हाण, 

नावडे विभाग अध्यक्ष आयु. संदेश घाडगे,महासचिव आयु. आनंद खरात , कामोठे विभाग अध्यक्ष आयु. महेंद्र जाधव, महासचिव आयु. वळंजू, उपाध्यक्षा आयु. आशाताई लवांडे, जितेंद्र घोलप, कामोठे कार्यकारणी,

खांदा कॉलनी विभाग, सचिव आयु. प्रियांका ओव्हाळ, उपाध्यक्ष आयु. प्रेमबुद्ध गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे पनवेल तालुका अध्यक्ष आयु. सुनिल कांबळे, तायडे गुरुजी , तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका उपस्थित होत्या, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे वंचित बहुजन आघाडीचे संघटन, खांदा कॉलनी परिसरात अधिक जोमाने आणि शिस्त बद्धपणे कार्यरत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साह आणि ऐक्याची नवी झळाळी प्राप्त झाली.

 


Leave a Comment

error: Content is protected !!