त्रिरत्न बुद्धविहार अशाळेपाडा येथे विजयादशमीनिमित्त कार्यक्रम संपन्न


कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव

उल्हासनगर – ४ येथील अशाळेपाडा परिसरातील त्रिरत्न बुद्धविहार येथे विजयादशमीनिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध, तथागतांचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाच्या मूल्यांचे स्मरण करण्यात आले.

विजयादशमी हा दिवस ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून बुद्धविहारात आयोजित कार्यक्रमातून बौद्ध धम्माचा संदेश आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

 

या कार्यक्रमामुळे परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश घेतला.


Leave a Comment

error: Content is protected !!