युवा नेते सुजात आंबेडकरांचा वैदू व वडार समाजाशी संवाद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीचा आढावा


कंधार:- नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा नेते सुजात आंबेडकर यांनी कंधार तालुक्यात वैदू समाज आणि वडार समाजातील बांधवांशी संवाद साधला. प्रचार दौऱ्यादरम्यान आयोजित या बैठकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करत तळागाळातील नागरिकांना न्याय, हक्क व विकासासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.

वंचित बहुजन आघाडी ही समाजातील दुर्लक्षित घटकांचा आवाज बनून त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक पातळीवरील पाणी, रोजगार, आरोग्य व शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पक्ष कटीबद्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!