
परतूर ता. प्रतिनिधी दिपक नाटभजन
सोलापूर —
सोलापूर शहरातील अत्यंत नामवंत व प्रभावशाली भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक माननीय रवि बॉस गायकवाड यांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रवेश सोहळ्याच्या वेळी राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. या कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी, यशपाल सोनकांबळे, यशवंत इंगळे, चंद्रकांत शिंगे (बनसोडे), राजकुमार वाघमारे, आणि अशोक कल्लाप्पा शिंगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रवि गायकवाड यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरातील वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे.