
उस्माननगर (प्रतिनिधी)दिनांक 29 नोव्हेंबर रोजी शेर हिद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले यास रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उस्माननगर ता. कंधार येथील तहेरिक ऐ- टिपू सुलतान कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शेर हिद शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या २७५ व्या जयंती टिपू सुलतान याच्या २७५ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीराचे उदघाटन शिराढोण येथील युवानेते अँड देवराव पांडागळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा माजी उपसरपंच राहुल सोनसळे हे होते. तर प्रमुख
पाहणे म्हणून सदर बाशीद शेख
उपसरपंच, जमील शेख अभियंता, बालाजी ईसादकर शेकाप जिल्हाध्यक्ष, दत्ता घोरबांड, संदीप काळम युवासेना तालुका प्रमुख कंधार, संजय ढाले शिवसेना तालुकाप्रमुख उबाठा, गंगाधर भिसे, युवा कार्यकर्ते तेजस भिसे, पत्रकार अमजद खान पठाण, माणिक भिसे, आमिनशा फकीर, मौलाना यांच्या सह अनेकांची उपस्थितीती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
. त्यानंतर ध्वजारोहण अँड. देवराव पांडागळे यांच्या हस्ते फडकावण्यात आला उपस्थित मान्यवरांचे तहेरिक-ऐ-टिप सुलतान कमेटीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व रक्तदान शिबीरासाठी हल हयात ब्लड

बँक नांदेड यांनी रक्तदात्याचे संकलन केले. यावेळी तरुणांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर खिचडी वाटप करण्यात आले. यशस्वी होण्यासाठी मुस्लिम तरुण बांधवांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देविदास डांगे यांनी केले तर आभार तेजस भिसे यांनी मानले. टिपू सुलतान कमिटीचे अध्यक्ष शकील शहा, फैयाज शेख, सैलानी शेख, सैदोदिन तांबोळी. ख, सलामा खस दस्तगीर शेख, हंजला चाऊस, बाबा तांबोळी, जलील शेख, मुनतलीफ पिंजारी, शकिल शेख यांच्यासह अनेक नवयुवक यावेळी उपस्थित होते. टिप सुलतान जयंती निमित्ताने दरवर्षीप्रमाने याही वर्षी रक्तदान शिबीर आयोजित करणे अनोखा उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित केला या उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे