उस्माननगर ( माणिक भिसे )
ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत उस्मान नगर पोलिसांनी वाळू उपसा करून साठा करणारे इसमां विरूध्द धडाकेबाज कार्यवाही करून एकुण 15, लाख 20 हजार रूपयाचा मुद्देमाल केला जप्त आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिली माहिती अशी की
दिनांक 10/05/26 रोजी 05.40 वाजताचे सुमारास गोदावरी नदीचे पात्रात मौजे येळी शिवार ता. लोहा जि. नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार,गजानन गाडेकर पोउपनि, सहा.पोलीस उपनिरीक्षक मगदुम महेबुब साब सय्यद, चिंचोरे, कल्लेवार, तुकाराम जुन्ने, माधव पवार आधी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
या प्रकरणी आरोपी 1) लोकेश संभाजी हंबर्डे रा. वाका ता. लोहा 2) माधव शिवाजी वडवळे रा. कापसी (बु.) ता. लोहा जि.नांदेड. 3) उत्तम बाबा ढगे रा. येळी ता. लोहा जि.नांदेड, आरोपीकडून तराफ्यावरील तीन इंजिन किं.अं. 15 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच पाच ब्रास रेती किं.अं. 20,000/- रुपये असा एकुण 15 लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. क्रॅक आऊट ” अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेतीचे उत्खनन,चोरटी वाहतुक व विक्री करणारे चालक व मालक या लोकांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन उस्माननगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, यांनी दिनांक 10 रोजी गुप्त बातमीदार यांचेकडील गोपनीय माहीतीवरून पोलीस उप निरीक्षक गजानन गाडेकर व पोलीस अंमलदार यांचे सह अवैध रेतीचे उत्खनन व साठा करणारे यांचेवर कारवाई करण्यासाठी मौजे येळी येथे गेले असता गोदावरी नदीचे पात्रात येळी येथे तीन तराफ्यावरील इंजिन व अवैध 5 ब्रास रेती मिळुन आली. तसा सविस्तर जप्ती पंचनामा करून 5 ब्रास रेती अंदाजे किमती 20,000/- रूपये व तीन तराफ्यावरील इंजिन अंदाजे किमती 15, लाख रूपये असा एकुण 15,20,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून इंजिन जाग्यावरच महसुल अधिकारी यांचे मदतीने नष्ट केले याप्रकरणी पोलीस कर्मचारी मगदूम सय्यद यांनी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा नोंदणी करण्यात आला आहे.