“संविधान सम्मान महासभा” — २५ नोव्हेंबर रोजी दादर येथे भव्य आयोजन


प्रतिनिधी : प्रदीप जाधव

मुंबई  : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “संविधान सम्मान महासभा” चे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या महासभेचे आयोजन मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (मुंबई) येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आहेत. त्यांनी सर्व संविधानप्रेमी, फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि मानवतावादी नागरिकांना या महासभेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी ही सभा ऐतिहासिक ठरणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.


Leave a Comment

error: Content is protected !!