पनवेल महानगरपालिका निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवार निवड प्रक्रिया सुरू


कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव                          पनवेल 18 डिसेंबर 2025 बहुजनांचे सुसंस्कृत नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय, श्रद्धेय, ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष माननीय दीपक भाऊ गायकवाड आणि रायगड जिल्हा कार्यकारणी यांच्या सूचनेनुसार, वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड आणि कार्यकारणी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुषंगाने पनवेल महानगरपालिका निवडणूक संदर्भात उमेदवार निवड प्रक्रिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास इच्छुक उमेदवारांनी आपली उपस्थिती दाखवली. त्यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांना आगामी पनवेल महानगरपालिका निवडणूक संदर्भात सूचना तसेच मार्गदर्शन केले.

त्याप्रसंगी, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ गायकवाड, पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, महासचिव संतोष मुजमुले, महासचिव अविनाश अडागळे, उपाध्यक्ष अमिना शेख, डॉ. छायाताई शिरसाट, कविता वाघमारे, सतिष अहिरे, प्रवक्ते कुमार मेटांगे, प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण, आणि कार्यकारणी, वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका महासचिव अक्षय उबाळे, आणि कार्यकारणी तसेच पनवेल महानगर विभागीय अध्यक्ष, आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!