
नांदेड :नवीन कौठा परिसरातील महात्मा बसवेश्वर पुतळा येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. राजेश भुतके (वय ४५) आणि त्यांचा नातू प्रणव (वय ४) यांना चारचाकी हायवा वाहनाने धडक दिल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी तत्काळ घटनास्थळी तसेच पीडित कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी या कठीण प्रसंगी कुटुंबाला धीर देत प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी केली.
https://youtu.be/qP7nDGSuMyE?si=eaPNaAAIbv404R8M