
नांदेड जि प्रतिनिधी: सूर्यकांत वाघमारे बारूळकर
मुदखेड:.तालुक्यातील वासरी येथील नारायण अर्जुनराव खानसोळे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांना राज्यस्तरीय 2020-21 चा आदर्श ग्रामसेवक (जिल्हा नांदेड) हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्ष होत आहे. सदरील पुरस्कार त्यांना ग्रामपंचायत अंजनखेड तालुका माहूर येथे गावातील घरकुलांना लाभार्थ्यास बांधकामास प्रोत्साहित करणे.नरेगातील सिंचन विहीर योजना कार्यक्षमरित्या राबविणे आणि विशेष गावातील 638 मालमत्ता नमुना नंबर आठ ला महिलांच्या नावाने नोंद केल्याबद्दल आणि गावात मुक्काम करून कोरोना काळात जनजागृती प्रबोधन केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात येणार आहे.दुसरं म्हणजे नारायण खानसुळे हे उत्तम कवी लेखक आहेत .त्यांचा एकतेची आरोळी नावाचा काव्यसंग्रह आहे त्यांची निस्वार्थ लोकसेवा कार्यनिष्ठ कार्यपद्धती आणि उत्कृष्ट लेखन कौशल्य यामुळे आपण समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे त्यांची कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.