म्हसरूळ गावात बाराशिंगे हरणांची थरारक झुंज; गावकऱ्यांमुळे दोन्ही हरीणांचे प्राण वाचले


जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

दिनांक : 28/11/2025 जि. जालना,ता. जाफ्राबाद : येथील म्हसरूळ गावातील शेत परिसरात एक अनोखी आणि थरारक घटना घडली. बाराशिंगे हरणांच्या दोन नरांमध्ये सुरू असलेल्या टकरीदरम्यान दोन्ही हरीण शेतातील ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये अडकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात अफरातफर उडाली.

घटनेची माहिती मिळताच गावातील सोनू मगरे, गणेश साबळे व बबलू लहाने यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अतिशय धैर्याने आणि संयमाने त्यांनी पाईप कापून मोठ्या प्रयत्नाने दोन्ही हरीण सुरक्षितरित्या मुक्त केली. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे हरणांचे प्राण वाचले. मुक्त होताच ती जंगलाच्या दिशेने धावून गेली.

https://youtu.be/pmb6QlrUpGk?si=45MaqW_bXRAQIbfM

या धाडसी आणि मानवतेच्या भावनेतून केलेल्या कार्याबद्दल गावकऱ्यांनी तिघांचे जाहीर कौतुक केले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.


Leave a Comment

error: Content is protected !!