एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू आई-वडीलांचा गळफास तर दोन मुलांनी दिला रेल्वेखाली जीव


नांदेड/प्रतिनिधी-जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची एक

 

हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई-वडीलांचा राहत्या घरात गळफास घेतलेला मृतदेह तर दोन मुलांनी रेल्वेखाली जीव दिल्याचे

 

उघडकीस आले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार या गावातील लखे कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली आहे. वडील रमेश सोनाजी लखे (वय ५१), आई राधाबाई रमेश लखे (वय ४५), पहिला मुलगा उमेश लखे आणि दुसरा मुलगा बजरंग लखे, असं मृतांची नावे आहेत. लाखे यांच्या

 

कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लगेचच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळले. त्यामुळे गावकरी आणि पोलीस प्रशासन चक्रावून गेले आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये पलंगावर पडलेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुलांनी आत्महत्या केली असली तरी, आई-वडिलांनी

 

देखील आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे अंत झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. चारही जणांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, आधी मुलांनी


Leave a Comment

error: Content is protected !!