माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त समता सैनिक दलाचे भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर;



नांदेड प्रतिनिधी : प्रकाश गवारे
माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने महिला व पुरुषांसाठी एकदिवशीय भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण शिबिर रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत नालंदा बुद्ध विहार, श्रद्धास्थळ भीमघाट, नांदेड येथे उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतमराव कांबळे (तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा) होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ईश्वर रावजी जोंधळे (शहर अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा) यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरासाठी मेजर जनरल सुरेश गजभारे यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले, तर कृष्णा गजभारे (सीनियर डिव्हिजन ऑफिसर) यांनी सहप्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण दिले.
शिबिरास पूज्य भदन्त पंय्याबोधी थेरो व भिक्षू संघ आणि लॉर्ड बुद्धा चॅनलचे प्रतिनिधी मा. सदाशिव गच्छे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रशिक्षण शिबिरात शिस्त, संघटन, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व समता सैनिक दलाची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित या प्रशिक्षण शिबिरात समता सैनिक दलामध्ये उत्कृष्ट कार्य व उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या सैनिकांचा मेडल प्रदान करून गौरव करण्यात आला. हे मेडल मेजर जनरल सुरेश गजभारे, तालुका अध्यक्ष गौतमराव कांबळे व शहराध्यक्ष ईश्वररावजी जोंधळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
मेडल प्राप्त सैनिकांची नावे :
कृष्णा गजभारे
सदाशिव हनुमंते
केशव वाघमारे
आनंद जोंधळे
ऋषिकेश भदर्गे
प्रकाश गवारे
भगवान वाघमारे
उत्तम जोंधळे
देवानंद धोतराज
या सर्व बहादूर व कर्तव्यदक्ष सैनिकांचे उपस्थित मान्यवर तसेच समता सैनिक दलाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकरे ताई, आनंदरावजी जोंधळे, केशव वाघमारे, भगवान वाघमारे, ऋषिकेश भद्रे तसेच समता सैनिक दलातील महिला व पुरुष सैनिकांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी उत्तम जोंधळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन आदरणीय आनंदरावजी जोंधळे (शहर सचिव), आदरणीय विजय पोपुलर (शहर सचिव, संरक्षण विभाग) तसेच समता सैनिक दलाच्या सर्व जिल्हा व शहर शाखा संरक्षण विभागाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.


Leave a Comment

error: Content is protected !!