स्वामी वेकानंद महाविद्यालय येथे मराठी भाषा दिन तसेच ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


 

प्रतिनिधी : भीमचंद्र प्रधान

आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे मराठी भाषा दिन तसेच ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य थिटे सर होते. प्रमुख उपस्थितीत जाधव सर, कांबळे सर, अवसरमोलकर सर, मुळे सर, देशमुख मॅडम, पाटील मॅडम, गायकवाड मॅडम तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि साहित्य क्षेत्रातील योगदान यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन, भाषणे व सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

 

मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनही उत्साहात पार पडले. संपूर्ण कार्यक्रमात मराठी भाषेचा गौरव आणि कुसुमाग्रजांच्या साहित्यिक कार्याचा सन्मान करण्यात आला.


Leave a Comment

error: Content is protected !!