मौजे उस्माननगर येथे ६ डिसेंबर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमअनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती


 

मौजे उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड) येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीमअनुयायी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. पहाटेपासूनच परिसरात भाविकांची गर्दी वाढत होती आणि वातावरण भक्तीमय झाले होते.

कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून

व बुद्ध वंदना आणि गाथा घेऊन कार्यक्रमाची सुरवात करून

आभिवादन करण्यात आले. उपासक–उपासिका, बालक–बालिका, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. शांतता, शिस्त आणि आंबेडकरी मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करत उपस्थितांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले.

 

या आभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि नागवंश मित्र मंडळ

यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या बाबासाहेबांच्या मूलभूत तत्वांचे स्मरण करून समाजात ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

गावातील पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Comment

error: Content is protected !!