जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव

जालना : शहरातील अंबड चौफुली जवळ असलेल्या वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांची मानेगांव येथील सकल आंबेडकरी समाज बांधवांनी दिनांक २५ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी सदिच्छा भेट घेतली व राज्यातील नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाल्यामुळे फुले -शाहू- आंबेडकरी मतदारांमधे नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिंकण्याची मानसिकता निर्माण झाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुले-शाहू-आंबेडकरी , आदिवासी,ओबीसी संविधानवादी समुह वंचित बहुजन आघाडीला एकजुटीने मौजपुरी जिल्हा परिषद गटातील निवडणूकीत साथ देणार असल्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात,बोरखेडी सरपंच मनोहर म्हस्के, युवा नेते मिलिंद सरकटे,तालुकाध्यक्ष भानुदास साळवे,तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे साहेब,तालुका संघटक राजरत्न अचलखांब,मिलिंद अचलखांब, राजेंद्र अचलखांब. कांताभाऊ अचलखांब,शिवाजी अचलखांब, विकास अचलखांब, सिद्धार्थ अचलखांब,प्रशांत अचलखांब, कैलास अचलखांब,बाजीराव अचलखांब यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
