वीरपक्ष ऋषी महाराज यांचा अभिषेक सोहळा ,किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न


रुपेश कांबळे:- कंधार

घोडज येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वीरपक्ष ऋषी महाराज देवस्थान घोडज, किर्तन व महाप्रसाद यांचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. घोडज येतील सर्व गावकरी ऋषी महाराज यांना मानणारा मोठा भक्त वर्ग व पंचक्रोशीत अनेक गावे,त्यांची श्रद्धा उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते.
वीर पक्ष ऋषी महाराज यांच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार, ह.भ.प. प्रकाश साठे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्या कार्यक्रमाला गावातील व बाहेरगावून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात कीर्तन ऐकण्यासाठी जमले होते. सर्वजण हसतमुखी व सुखी राहावे, येणारे वर्ष सर्वांना सुख समृद्धी मिळावी, नवीन वर्षी सुखाचे जावे असा संदेश महाराजांनी कीर्तनातून त्यांना दिला आणि कार्यक्रमाची सांगता केली. त्यानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडला. त्यामध्ये सर्व तरुणवर्गांनी मोठ्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. लहान थोर सर्वांनी या कार्यक्रमात मोठा उत्साहाने सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात मोलाचं योगदान दिलं.


31 डिसेंबरला कार्यक्रम ठेवण्याचा मोठा हेतू गावातील तरुण वर्ग, थर्टी फर्स्ट मोठ्या प्रमाणात दारू मटन, व पार्ट्या करत होते. त्यामधून वाद विवाद होण्याची शक्यता वाटत होती. ते कुठेतरी थांबलं पाहिजे.
वर्षभर ऋषी महाराज यांचा अभिषेक केला जातो. त्यामध्ये अभिषेक करणारे सर्वांनी मिळून वर्षाच्या शेवटी सामूहिक देवाचा अभिषेक करून महाप्रसाद व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस ठरवला. त्यातूनच गावातील सर्व ऋषिभक्त त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहू लागले.

त्यामुळे गावातील दारू मटण पार्टी करणे बंद झले. हाच कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात साजर करण्यात येत आहे. त्यामुळे पंचक्रोशी मध्ये गावचा एक आदर्श सर्व तालुक्यांमध्ये नाव होत आहे. एक आगळावेगळा कार्यक्रम त्या कार्यक्रमानिमित्त सर्व गावातील ऋषीभक्त एकत्र येऊन आपल्या सुख दुःख विसरून आपल्या ऋषी महाराज देवासमोर आराधना करून मागील वर्षे चांगले गेले तसे पुढील वर्षी सर्वांना सुख-समृद्धी जावो अशी प्रार्थना करतात. त्यामुळे सर्व जातीधर्मात गावातील लोकांमध्ये एकोपा आणि सुलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाला गावातील सर्व जाती-धर्मातील नागरिक, तरुण, मुलं-मुली बाईल लेकी मोठ्या प्रमाणात जमत असतात. या कार्यक्रमाचा सर्व पंचक्रोशीत लोकांकडून स्वागत होत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील भीमराव लाडेकर व त्यांची सर्व टीम,१०९अभिषेक करणारे ऋषी भक्त व गावातील सर्व नागरिकांनी घेतली.


Leave a Comment

error: Content is protected !!