अप्पर तहसील कार्यालय यादीतून सेवलीला डावलल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक आ.बबनराव लोणीकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन


जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासना कडून नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे व गावातील प्रतिष्ठित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शासनाच्या व आ.बबनराव लोणीकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सेवलीला अप्पर तहसील कार्यालय मंजुरी न दिल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके,सतिश गुमे,बबन मेहेत्रे,अतुल शेवलीकर, शरद तळेकर,अशोक तळेकर लक्ष्मण राठोड, दिलीप बिबे, भगवान मघाडे, मुकुंद काळे, शत्रुघ्न कोळी अनिल खाडे, दत्ता खाडे,रोशन सदावर्ते किरण काळे,लखन सदावर्ते, शहाजी खाडे,सुनील काळे, संतोष खाडे, गौतम मगर, प्रसाद सदावर्ते दिलीप मगर,अर्जुन घुगे,संतोष खाडे ,विकास सदावर्ते, सुरेश काळे बाबासाहेब लहाने संतोष मगर,मदन डोके,करण डोके, दिपक उघडे,आत्माराम तुरेराव, अरूण काकडे, मधुकर शेजुळ, पांडुरंग दाहीजे, किशोर खारकरी, लिंबाजी गिरी, गणेश मोरे, इंद्रजीत जोशी, मच्छिंद्र काळे, अशोक काळे प्रकाश कायंदे, विष्णु राठोड, अमोल नांगरे, संदिप केंद्रे, विकास सदावर्ते यांच्या सह मोठ्या संख्येने बांधव सहभागी होते.

 


Leave a Comment

error: Content is protected !!