बाबीर विद्यालयात बैलगाडीतून वाजत गाजत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत,,


प्रतिनिधी : सागर लोंढे 

 रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026 /27 या नवीन वर्षांमध्ये इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना रुरुई गावचे अंकुश पाटील यांच्या बैलगाडीत वाजत गाजत हलगीच्या व लेझीमच्या तालावर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके व गुलाब पुष्प,चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटील उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पोलीस पाटील अजितसिंह पाटील,प्रा.शाळेचे माजी मुख्याध्यापक सर्जेराव मारकड, शिक्षिका मीरादेवी पाटील,प्रतिक्षा पाटील, गुरुकुल विभागाच्याललिता लवटे, ग्रामस्थ अंकुश पाटील, हनुमंत घोगरे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका गुरुकुल विभाग व शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अमीन मुल्ला व लेझीम प्रात्यक्षिक बादशाह मुलाणी यांनी घेतले आणि सूत्रसंचालन पर्यवेक्षक धनाजी गावडे यांनी केले तर आभार सुनील दराडे यांनी मानले.


Leave a Comment

error: Content is protected !!