
लोहा : दि. 17/ जून रोजी लोहा येथील जायकवाडी प्रकल्पामधील पंचरंगी ध्वज
काढल्याच्या व विटंबनेच्या निषेधार्थ
नांदेड दक्षिण च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निश्चय निर्धार करण्यात आला.
ही बैठक हॉटेल पंजाब बाग
चंदासिंग कॉर्नर, तुप्पा नांदेड-दक्षिण या ठिकाणी घेण्यात आली.

या बैठकीचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे *जिल्हा महासचिव तथा नांदेड दक्षिणचे निरीक्षक रवि पंडित तुप्पेकर* यांनी सविस्तर या घटनेचा तपशील व घटनाक्रम आणि गांभीर्य उपस्थित कार्यकर्त्यांना सांगण्यात आला. याप्रसंगी या मोर्चाचे नेतृत्व करत असलेले वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण *जिल्हाध्यक्ष शंकर महाजन* यांनी देखील या मोर्चासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हाव अस आव्हान केलं.
या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून *वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश सदस्य अक्षय भाऊ बनसोडे* यांनी युवकांना आव्हान करून मोठ्या संख्येने युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहिजे व मोर्चाची कॅम्पेनिंग युवकांनी केली पाहिजे असा आव्हान त्यांनी केलं. यानंतर
*महानगर अध्यक्ष विठ्ठल भाऊ गायकवाड* यांनी या मोर्चासाठी शिस्तबद्ध नियोजन करून आयत्यावेळी या मोर्चामध्ये इतर बोगस कार्यकर्ते शिरकाव करणार नाहीत किंवा त्यांनी या मोर्चामध्ये कोणतेही गालबोट लावता कामा नये अशा काही सूचना केल्या. यावेळी *जिल्हा उपाध्यक्ष विनायक गजभारे, अरुण भद्रे, गणपत सवयी सोनकांबळे, जिल्हा सचिव रंगनाथ गजले, जिल्हा संघटक संजय टिके, जिल्हा सल्लागार कायदेविषयक जयपाल ढवळे, प्रसिद्धीप्रमुख नामदेव पांचाळ, हनुमंतराव आंचोलीकर, भीमराव बेंद्रीकर युवा शहराध्यक्ष सुकासिंग टाक महाराज, शुद्धोधन कापशीकर, सम्राट आढाव, युवा जिल्हा उपाध्यक्ष राज बुद्धे, युवा नेते धमा ऐगंङे, संदेश भालेराव, आकाश राक्षेसमारे, संदेश गायकवाड, यशवंत गोणारकर यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*




