डॉ आंबेडकर पदस्पर्शदिन म्हणजे सिन्नर वासियांच्या कार्याची गौरवगाथा – दिपक गायकवाड


 सिन्नर ( नाशिक) :- १६ ऑगस्ट २०२६ रोजी सिन्नर येथे झालेल्या ‘ डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शदिन ‘ सोहळ्यात जेष्ठ साहित्यिक व विचारवंत मा. दिपक गायकवाडसर यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना हे वरील वक्तव्य केले. त्यांनी बोलताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हि एक ऐतिहासिक भूमी असून, या सिन्नरनगरी मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ‘ जादा जूडी ‘ प्रकरणाच्या निमित्ताने आले होते व येथे त्यानिमित्ताने भव्य अशी परिषद भरली होती. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून दोन ते अडीच हजार जनता जमल होती. या परिषदेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ आंबेडकरांनी इंग्रजउ सरकारला असा ईशारा दिला होता की, ‘ ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शिवशाहिच्या व पेशवाईच्या काळात पाटील, कुलकर्णी यांना जहागिरी म्हणून जमिनी देण्यात आल्या व त्यांना जहागिरदार बनवण्यात आले होते, त्याच प्रमाणे याच महाराष्ट्रातील महार समाजाला ज्या जमिनी मिळालेल्या आहेत त्या मुस्लिम राजवटित इनाम म्हणून मिळालेल्या आहेत. जर इंग्रज सरकार जहागिरदार, पाटिल व कुलकर्णी यांच्या जमिनीवर शेतसारा घेत नसेल तर, महार समाजाच्या इनामी जमिनीवरही शेतसारा घेण्याचा इंग्रज सरकारला कोणताच हक्क नाही. तेंव्हा इंग्रज सरकारने हा निर्णय व कायदा त्वरीत मागे घ्यावा ” अशी सिंहगर्जना केेली होती. यामुळे इंग्रज सरकारलाही डॉ आंबेडकरांपूढे नमते घ्यावे लागलेे व त्यांना आपला निर्णय बदलने भाग पडले. यामुळे तेंव्हापासून या सिन्नर तालुक्याला ‘ न्यायभूमी ‘ म्हणून ओळखले जाते. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून १६ ऑगस्ट २०२५ पासून हा पदस्पर्शदिन साजरा करण्याचे ठरले व हे त्याचे दूसरे वर्ष आहे. असे दिपक गायकवाड बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र मा. कासाहेब खंबाळकरर मा.आबासाहेब चासकर, मा. अडंगळे मा.विनोद जाधव हे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते. या कार्यक्रमाच्या सभेचे अध्यक्षस्थान सिन्नर . नगरसेविका कांताबाई जाधव यांनी भूषविले. तर नगरसेविका शोiभा जाधव यांनी उदघाटन केले. परिषदेचे नगराध्यक्ष मा. उगले यांनी आपली प्रमुख उपiस्थिती दर्शवली. या कार्यक्रमासाठी i समितीच्या माजी नगरसेवक मा. प्रभाकर जाधव, आर. एन्. जाधव, हरेष जाधव, राधू काळू साळवे या सदस्यांनी आपापले बहुमुल्य योगदान दिले. तर या कार्यक्रमाच्या आयोजक समितीचे मा.मंगेश जाधव, मा. रावसाहेब आढाव, मा. किरण गांगुर्डे, प्रविण जाधव, मधुकर जाधव, पोपट जाधव यांनी मोलाचे आर्थिक योगदान देऊन भव्य कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाची रंगत घोडेराव आणि पार्टी यांनी आपल्या गायनाने वाढवली. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांना समताभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचेु सूत्रसंचालन जेष्ठ बौद्धाचार्य मा. बाळासाहेब आव्हाड यांनी केलेे.


Leave a Comment

error: Content is protected !!